जिल्ह्यात दि.13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत “कुष्ठरोग शोध मोहीम” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम”

 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 15 तालुके व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण लोकसंख्या 21 लाख 48 हजार 773 चे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एकूण 1 हजार 662 आरोग्य पथके व 332 पर्यवेक्षक नेमण्यात आली असून एकूण 4 लाख 81 हजार 752 घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे.

आदिवासी भागातील पाडे, वस्त्या, डोंगराळ भाग, आदी भागात कुष्ठ व क्षयरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे सहाय्यक संचालक डॉ.आर.एच.बाविस्कर यांनी कळविले आहे.

तरी दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व सहाय्यक संचालक डॉ.आर.एच.बाविस्कर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक