जिल्ह्यातील दोन लाख मतदार जोडले गेले 'आधार'शी..!

 

अलिबाग,दि.06 (जिमाका):- मतदार यादी अपडेट व अचूक असावी, याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या महिनाभरात जिल्ह्यातील 1 लाख 93 हजार 304 मतदार आधारशी जोडण्यात आले आहेत.

त्यानुसार 188 पनवेल- 24 हजार 106, 189 कर्जत- 23 हजार 774, 190 उरण- 39 हजार 935, 191 पेण- 16 हजार 938, 192 अलिबाग- 6 हजार 465, 193 श्रीवर्धन- 47 हजार 477, 194 महाड- 34 हजार 609 अशा एकूण 1 लाख 93 हजार 304 मतदारांनी आज रोजीपर्यंत आपले मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक केले आहे.

जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 22 लाख 70 हजार 768 इतकी आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त मतदार ओळखपत्र आधार लिंक करण्यावर भर देत असून यासाठी जिल्ह्यात जागोजागी स्टॉल लावण्यात आले आहेत. यासोबतच काही विशेष शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात येत असून यामध्ये आधार नोंदणीसाठी मतदारांकडून अर्ज क्रमांक 6 ब भरून घेतले जात आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने आपले मतदार ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड