मतदाराचा आधार क्रमांक मतदार यादीतील तपशिलाशी ऐच्छिक जोडणी कार्यक्रम जाहीर दि.11 सप्टेंबर ला पहिले विशेष शिबिर

 


 

अलिबाग,दि.10 (जिमाका):- निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली असून दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे.

             त्यानुषंगाने मतदार यादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 B नुसार फॉर्म नं. 6 ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून लागू झालेली आहे.

             दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेल्या मा. भारत निवडणूक आयोगाच्या उपक्रमास सर्व स्तरातून सहकार्य मिळावे व सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे अगर प्रमाणिकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक