पनवेल महापालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करीता पथक


अलिबाग दि.30 (जिमाका)- जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीमधील सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीकरीता तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे.
या पथकाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पनवेल भारत शितोळे हे आहेत.  तर पनवेल महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भगवान गोविंद खाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल झोन-2 प्रकाश हिलेवाड  हे सदस्य आहेत.
त्यांचे संपर्क याप्रमाणे-
  अध्यक्ष- 022-27452328, मोबाईल 9820287655 ई- मेल-sdo_panvel@yahoo.com,
सदस्य श्री. खाडे 022-27458041, मोबाईल- 9595550009 ई-मेल- panvelnaarparishad@gmail.com ,
सदस्य श्री. हिलेवाड 022-27452532, मोबाईल-9167903131  ई मेल- scppanvelnm@gmail.com
तरी नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, रायगड यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक