अल्पसंख्याक बहुल शाळांच्या पायाभूत विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

 अलिबाग दि.1 (जिमाका)- अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संख्या व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव पाठवावे. परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडे 18  सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड