संवादपर्व:आदर्श मित्र मंडळ येथे: पथनाट्यातून उलगडली 'वाटचाल रायगडची'


            अलिबाग दि.2, (जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात  घरत आळीतील आदर्श सार्वजनिक गणेशमंडळात 'वाटचाल रायगडची' या पथनाट्यातून जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल उलगडण्यात आली.
शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन  आदर्श मित्र मंडळ, घरत आळी, अलिबाग येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.
                       यावेळी आदर्श मित्र  मंडळाचे अध्यक्ष रविकिरण आंबेकर, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, सुधीर अग्रावकर, प्रसाद पाटील, प्रविण नाईक, प्रशांत नाईक, राजेश म्हात्रे, पत्रकार प्रफुल्ल पवार,  प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी, प्रतिम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे, अफान गझाली, सुचित जावरे आदि उपस्थित होते.
           यावेळी आदर्श मित्र  मंडळाचे अध्यक्ष रविकिरण आंबेकर यांनी मंडळामार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याची माहिती दिली. प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांनी वाटचाल रायगडची पथनाट्यातून किल्ले रायगड विकास, कामांचे स्वरुप, जलयुक्त शिवार, शेततळे, 4 कोटी वृक्ष लागवड, क्रीडा संकुल, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांची आणि त्याद्वारे जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विठ्ठल बेंदुगडे, जयंत ठाकूर, अशोक मोरे, सचिन काळुखे यांनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक