जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले


अलिबाग,(जिमाका)दि.28-  नेहरु युवा केंद्र, अलिबाग- रायगड (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय,भारत सरकार) यांच्यावतीने दरवर्षी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळांना ‘उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत व नेहरु युवा केंद्रासोबत संलग्न युवा मंडळांनी दि.1 एप्रिल 2016 ते मार्च 2017या कालावधीत केलेल्या सामाजिक,साक्षरता, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरण, व्यावसायिक प्रशिक्षण, हुंडा निर्मुलन,वनीकरण,आरोग्य्‍ आणि कुटूंब कल्याण इत्यादी सोबत जी युवा मंडळे स्थानिक आणि राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यावर कार्यक्रम घेत आहेत. तसेच वेगवेगळ्यास्तरांवर विविध विभाग आणि संस्थांशी समन्वय साधून समाजातील विकास, क्रीडा-सांस्कृतिक उपक्रम आणि इतर विकासात्मक कार्यक्रमांत पुढाकार घेत आहेत. अशा कामाची माहिती विहीत नमुन्यात अर्जाच्या दोन प्रतीत  मागविण्यात आली आहे. या प्रस्तावामध्ये संबंधित कार्यक्रमाचे फोटो,वृत्तपत्र कात्रणे, प्रमाणपत्रे तसेच  लेखा परिक्षण होणे आवश्यक आहे. प्रस्ताव  दि. 15 सप्टेंबर 2017 पर्यंत पाठवावेत. त्यानंतर आलेले प्र्स्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. मागील दोन वर्षामध्ये ज्या मंडळांना नेहरु युवा केंद्राचा युवा मंडळ पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांनी प्रस्ताव पाठवू नये.
पुरस्काराचे स्वरुप-रोख रक्कम रुपये पंचवीस हजार,मानचिन्ह,सन्मानचिन्ह असे उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारासाठी करावयाचे अर्ज व अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, सार्थक बंगला, श्रीबाग नं.02, अलिबाग रायगड. (ई-मेल-qnykalibag@gmail.com )दूरध्वनी क्रमांक02141-222630 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधावा. असे  आवाहन जिल्हा युवा समन्वयक प्रल्हाद सोनूने यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक