बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर तात्पुरती कुर्बानी केंद्र चेकनाक्यांवर सक्षम अधिकारी नियुक्त


अलिबाग,(जिमाका)दि.1- रायगड जिल्ह्यात शनिवार दिनांक 2 ते 4 सप्टेंबर या दरम्यान  बकरी ईद साजरी होत आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यात एकही  नोंदणीकृत कत्तलखाना  नाही. ग्रामीण व शहरी भागांतून तात्पुरत्या कुर्बानी केंद्रास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांना असल्याने त्यांच्या मंजूरीने जिल्ह्यात धामद,ममदापूर,साळोख ता.कर्जत व तळोजा ता.पनवेल तसेच शिळफाटा खोपोली ता.खालापूर येथे तात्पुरत्या कुर्बानी  केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.  यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व चेकनाक्यांवर पोलीस यंत्रणेने  चोख बंदोबस्त ठेवला आहे.  शांतता राखण्याचे आवाहनही पोलीसांमार्फत करण्यात आले आहे.  तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी पोलीस यंत्रणेने निश्चित केलेल्या चेकनाक्यावर सक्षम अधिकार असलेले पशुधन विकास अधिकारी यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक