किल्ले रायगड आणि चवदार तळ्याला भेट देऊन पालकमंत्र्यांनी केला पहिल्या दौऱ्याचा प्रारंभ


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14-छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी किल्ले रायगड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चवदार तळे, महाड  येथे भेट देऊन नवनियुक्त पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पहिल्या जिल्हा दौऱ्यास प्रारंभ केला.
रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महाड येथील चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांचे समवेत आ.प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रांताधिकारी विठ्ठल  इनामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार, नायब तहसिलदार प्रदीप कुडाळ यांसह राजेय भोसले, जयवंत दळवी आदी प्रमुख कार्यकर्ते- पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाड नगरपालिकेच्या वतीने ना. चव्हाण  यांचे स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज