ऑनलाईन शाळा प्रवेशाची प्रक्रिया


अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.16- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील नियमान्वये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना सर्व खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित 244 पात्र शाळांमध्ये  पूर्व प्राथमिक 3628 असे एकूण 4065 जागा आर.टी.ई 25 टक्के   ऑनलाईन प्रवेश प्रवेशाकरीता राखीव आहेत. अंतिम दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहील.
ऑनलाईन अर्ज भरतांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-
जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य) (भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक)(सर्व घटकांना अनिवार्य)
सामाजिक वंचित घटक (पालकांचा, बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र  ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.)
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु.एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
आर.टी.ई. 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत घटस्फोटीत महिला, विधवा महिला यांची बालके, अनाथबालके व दिव्यांग बालके बाबत पुढील कागदपत्रे आवश्यक राहतील.
घटस्फोटीत महिला- न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटीत  महिलेचा, बालकांच्या आईचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला
विधवा महिला-पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेचा, बालकांच्या आईचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
अनाथ बालक-  अनाथ बालकांच्या अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहात नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.
दिव्यांग बालक-दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणाचे असावे.
ऑनलाईन माहिती भरतांना झालेल्या चुका (जसे बालकाचे नावातील, अडनावातील किरकोळ चुका) गृहीत धरुन शाळांना प्रवेश नाकारता येणार नाही. पालकांनी कोणतेही प्रकरण कागदपत्र अपलोड करु नये. मात्र, उत्पन्नाचा दाखल्यावरील बारकोड खाली नमूद क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचे दाखले हे संबंधित प्राधिकरण (तहसिल कार्यालय) यांनी प्रमाणित केलेले असावेत. हे दाखले तपासण्याचे अधिकार शाळांना असणार नाहीत. आर्थिक दुर्बल घटकातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी महाऑनलाईन या Portal द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. पालकांनी 25टक्के प्रवेशाकरीता  बनावट, बोगस उत्पन्नाच्या दाखल्यांचा वापर केलेला आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज भरतांना अचुक व खरी माहिती भरावी.  तसेच Allotment झालेल्या विद्यार्थ्यांना शाळांनी विहित मुदतीत प्रवेश देणे बंधनकारक आहे,  असे आवाहन बी.एल.थोरात, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक