राष्ट्रीय लोकअदालतीस उत्तम प्रतिसाद


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे शनिवार दि. 10 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.
रायगड जिल्ह्यात शनिवार दि.10 रोजी सर्व न्यायालयामध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने 33 कक्षांचे आयोजन करण्यात आले होते. 
अलिबाग येथील लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर,  दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण   एल.डी.हुली,  अलिबाग नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश चौधरी, इतर न्यायिक अधिकारी, वकील आदी यावेळी उपस्थित होते.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये 4143 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 836 प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामध्ये 7 कोटी 15 लाख 41 हजार 495 इतकी रक्कम भरण्याचे मान्य करण्यात आले. तसेच वादपूर्व प्रकरणे 20920 तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यापैकी 5604 प्रकरणे निकाली निघाली व त्यामध्ये रक्कम रुपये 7 कोटी 28 लाख 91 हजार 065 इतकी देण्यात आली. अशी माहिती  सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी दिली.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक