केंद्र शासनाच्या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी व्यक्ती/ संस्थांनी अर्ज सादर करावेत

 

अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):-  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.

बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बालकल्याण पुरस्कार:

वैयक्तिक पुरस्कार- मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो.

 संस्था स्तरावर: बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

बाल शक्ती पुरस्कार सन 2022 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.15 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विनित म्हात्रे यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक