मासळी सुरक्षा व पणनकरिता सफेद बर्फाचा वापर करावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16-  बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये व अखाद्य बर्फात अन्न सुरक्षा मानके कायद्यात नमूद केलेला व खाद्योपयोगी वापरण्यात येणार रंग Indigo Carmine  किंवा Brilliant FCF रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल एवढा किमान 10 पीपीएम खाद्यरंग टाकावा.  तसेच खाद्य विक्री व खाद्यपदार्थात वापरण्यात येणारा बर्फ, बर्फ उत्पादक, साठा वितरण, वाहतूक व विक्री यावर अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2011 तील तरतुदीनुसार कारवाई होईल व अखाद्य बर्फाच्या उत्पादकांनी त्यामध्ये खाद्यरंगाचा वापर केला नाही तर सदरचा बर्फ खाद्यबर्फ समजून त्याला अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कार्यकक्षेत समजला जाईल.  मच्छिमार सहकारी संस्था व बर्फ पुरवठा धारकांनी फक्त सफेद बर्फाचा वापर करावा. माशांच्या साठवणीसाठी निळ्या बर्फाचा वापर केला तर त्याच्या विरुध्द करण्यात येईल असे पु.वि.भालेकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक