रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 17 सप्टेंबर  2016                                                                                             वृत्त क्र. 607

रायगड जिल्ह्यात
 वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग दि.17 :- रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिला आहे.
            रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला असून 7 से.मी. ते 12 से.मी. इतका पाऊस तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक 12 से.मी. ते 24 सें.मी. पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  वाऱ्याचा वेग 45 ते 55 कि.मी. प्रतितास असा राहणार असून या कालावधीत समुद्र खवळलेला राहिल.  त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये  असा इशारा देण्यात आला आहे.
                                                            0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक