स्वच्छतेची मोहिम अभियानापुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

दिनांक :- 17 सप्टेंबर  2016                                                      वृत्त क्र. 603

स्वच्छतेची मोहिम अभियानापुरती
मर्यादित न ठेवता नियमित असावी
                                                          --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले






            अलिबाग दि. 17:- निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून स्वच्छता  मोहिम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे  केले. 
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिम अंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हा प्रशासन, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या.   यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आर.जे.नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अलिबाग प्रांत.सर्जेराव सोनावणे, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन सुरज नाईक, कंमाडर कोस्टगार्ड मुरुड-जंजिरा रणजितकुमार सिंग, कोस्टगार्डचे सवोर्नेटर ऑफीसर जे.पी.यादव,तहसिलदार प्रकाश संकपाळ, तहसिलदार सा.प्र.जयराज देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियानाद्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे.  त्यानुसार आपण सातत्याने  स्वच्छता मोहिम विविध ठिकाणी राबवितो.   आज आपण अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करुन पर्यटकांना त्याचे आकर्षण राहिले असे पहावे.   
तर या निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.  ही स्वच्छता मोहिम 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे विभागीय अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी यावेळी दिली.
विविध विभागांचा सहभाग
या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आर.जे. नार्वेकर, श्रीमती नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. तसेच  जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे पथक, तट रक्षक दलाचे जवान, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे श्री सदस्य, प्रिझम व स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था  तसेच महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी  यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेऊन अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ केला.
0000






Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक