पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 337 जणांची प्राथमिक निवड



अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व  अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होते.  यामेळाव्यात सहभागी विविध कंपन्या व उद्योजकांनी 640 जागांसाठी  या मेळाव्यात उमेदवारांना पाचारण केले होते. त्यात 540 उमेदवारांनी उपस्थिती दिली व त्यातील 337 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
अलिबाग न.प. शाळा क्रमांक 1 येथे हा मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रशांतशेठ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक एस.जी. पवार, मुख्याधिकारी महेश चौधरी, ॲड प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, कोटक महिन्द्रा बँक, डीएचएफएल बँक, अल-फलाह, आगा कारवान, पीएसआयपीएल, मिंट स्कील, फास्टट्रॅक सोल्युशन्स, आदित्य बिर्ला ग्रुप, युरेका फोर्ब्स, पीआयजीयो, एसकेएसपीएल, कादीर एन्टरप्राईजेस, डेल्टाफिल्टर अँड सेपरेटर्स प्रा.लि.,जार्वीस टेक्नॉलॉजिज, टेक्नोसीम ट्रेनिंग सर्व्हिसेस, इत्यादी आस्थापनांचे प्रतिनिधी त्यांचेकडील रिक्तपदांकरीता उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते.
 यावेळी अलिबाग शहर व परिसरातून540उमेदवार उपस्थित होते. उपस्थित कंपन्यांना 640 पदांसाठी भरती करावयाची होती. तथापि 337 उमेदवार नोकरीस पात्र ठरले.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी सहायक संचालक एस.जी. पवार, मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक