अलिबाग येथे शुक्रवारी(दि.15) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा



अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व  अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 10 वा.अलिबाग न.प. शाळा क्रमांक 1, सरखेल कान्होजी आंग्रे समाधीजवळ, अलिबाग, ता.अलिबाग, जिल्हा-रायगड येथे होणार आहे.
                या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, कोटक महिन्द्रा बँक, डीएचएफएल बँक, अल-फलाह, आगा कारवान, पीएसआयपीएल, मिंट स्कील, फास्टट्रॅक सोल्युशन्स, आदित्य बिर्ला ग्रुप, युरेका फोर्ब्स, पीआयजीयो, एसकेएसपीएल, कादीर एन्टरप्राईजेस, डेल्टाफिल्टर अँड सेपरेटर्स प्रा.लि.,जार्वीस टेक्नॉलॉजिज, टेक्नोसीम ट्रेनिंग सर्व्हिसेस, इत्यादी आस्थापनांचे प्रतिनिधी त्यांचेकडील रिक्तपदांकरीता उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सहभागी होणार आहेत.
या कंपन्यांना त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी आवश्यकतेनुसार, एस.एस.सी. पास/नापास,12वी, पदवी/पदवीकाधारक,आय.टी.आय.,इत्यादी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची आवश्यकता आहे. वयोमर्यादा 18 ते 45 दरम्यान आहे.
उमेदवारांनी मुलाखतीस येताना स्वत:च्या बायोडाटाच्या चार प्रती, चार फोटो, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके, दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाचा दाखला असल्यास तो ही आणावा आणि त्यांच्या  छायांकित प्रतिंसह वरील ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन सहायक संचालक एस.जी. पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या संदर्भात अलिबाग नगरपरिषदेत 22205,222946 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन  मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक