सर्व समावेशक महिला सल्लागार समिती सभा पिडीत महिलांच्या सहाय्यासाठी एकात्मिक सेवा केंद्राचा प्रस्ताव



 अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका)-अन्याय व अत्याचार पिडीत महिलांना सर्व प्रकारची मदत व तत्पश्चात पुनर्वसन सेवा देण्यासाठी एकात्मिक सेवा केंद्राचा प्रस्ताव असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावावा, अशा सुचना जिल्हा सर्व समावेशक महिला सल्लागार समितीने दिल्या आहेत.
 जिल्हास्तरीय सर्व समावेशक महिला सल्लागार समिती तसेच बाल न्याय अधिनियम 2018 अन्वये स्थापन जिल्हास्तरीय बाल सल्लागार समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा परिविक्षा समिती, जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती  बैठक  जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.14) पार पडल्या. यावेळी  उपजिल्हाधिकारी रविंद्र पठपती हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर यावेळी सत्र न्यायाधीश मलशेट्टी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव या. जयदीप मोहिते, कारागृह अधिक्षक एस.आर.पवार,पोलीस निरीक्षक  सुरेश वराडे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, उपशिक्षणाधिकारी एस.सी.पवार, तसेच समितीचे सदस्य डॉ.नीता कदम, शोभा उदय जोशी,  ॲड. रोशनी ठाकूर, राहुल किसन धुळे, ॲड दीपाली बोंद्रे, शुभांगी झेमसे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, किरण वाघुळे, जिल्हा संरक्षण अधिकारी  गिरीश चौरे, रामकृष्ण रेड्डी,  तसेच सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील बालसंपर्क सेवा (Child Line-1098) या हेल्पलाईनची माहिती अधिकाधिक बालकांपर्यंत विविध यंत्रणांनी पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात 1876 गावांमध्ये ग्राम बालसंरक्षण समित्या स्थापन झाल्या असल्याची माहितीही देण्यात आली. तसेच बालन्याय अधिनियम 2018 अन्वये बालकांच्या विविध समस्या व पिडीत बालकांना सर्वतोपरी मदतीसाठी  राबविण्यात येणाऱ्या  विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.  यावेळी माहिती देण्यात आली की, प्रस्तावित एकात्मिक सेवा केंद्रात पिडीत महिलांसाठी निवास, आरोग्य सुविधा, विधी सेवा व मार्गदर्शन तसेच शिक्षण व पुनर्वसन सेवा एकाच छताखाली व विनामूल्य उपलब्ध असतील.सदरचे केंद्र हे श्रीवर्धन अथवा रोहा येथे उभारण्याचे प्रस्तावित असून हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा अशी सुचना समितीने यावेळी केली.  
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक