वावंजे,शिरवली,सोनारी ग्रा.पं. कार्यक्षेत्रात मनाई आदेश



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत वावंजे व शिरवली ग्रामपंचायत तसेच न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत सोनारी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून दि.24 रोजी मतदान व दि.25 रोजी मतमोजणी होणार आहे.  या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी वर नमूद ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात बुधवार दि. 27 च्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.  पोलीस उप आयुक्त विशेष शाखा नवीमुंबई पंकज डहाणे यांनी हे आदेश निर्गमित केले असून आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक