पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



  
 अलिबाग, जि.रायगड, दि.08 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
उलवे येथील मातृछाया अपार्टमेंट, प्लॉट नं.131, सेक्टर-02, पहिला मजला हा इमारतीचा भाग.
मु.शेलघर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-मनोहर काशिनाथ भगत यांचे घर, पश्चिमेस-जनार्दन भगत यांचे घर, दक्षिणेस- संतोष भगत यांचे घर व उत्तरेस-प्रतिक जगजीवन भगत यांचे घर हा परिसर.
मु.शेलघर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-गुलाब तुकाराम घरत यांचे घर, पश्चिमेस-रघुनाथशेठ घरत यांचे घर, दक्षिणेस- जिल्हा परिषद शाळा व उत्तरेस-रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स हा परिसर.
मु.बामणडोंगरी, पो.वहाळ येथील पूर्वेस-अंगणवाडी, पश्चिमेस-संतोष जनार्दन म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस- उलवे नोड सेक्टर-19 बी व उत्तरेस-गणेश हिरा नाईक यांचे घर हा परिसर.
मु.ओवळे, पो.पारगाव येथील पूर्वेस-तुकाराम महादेव पाटील यांचे घर, पश्चिमेस-मोकळे मैदान, दक्षिणेस-उदय शंकर पाटील यांचे घर व उत्तरेस-जयराम जनार्दन गायकवाड यांचे घर हा परिसर.
घर क्र.101 ब, भिंगार, पो.आजिवली येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-शेती, दक्षिणेस-तुकाराम मुकूंद गायकर यांचे घर व उत्तरेस-शेती हा परिसर.
मु.गणेश नगर, वलप येथील पूर्वेस-नामदेव पाटील यांचे घर, पश्चिमेस-रिकामी जागा, दक्षिणेस-रिकामी जागा व उत्तरेस-पडीक जागा हा परिसर.
मु.स्वप्ननगरी ए-8, भोकरपाडा, पो.चिपळे येथील पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-साईबाबा मंदिर, दक्षिणेस-स्वप्ननगरी ए-4 व उत्तरेस- स्वप्ननगरी ए-9 हा परिसर.
मु.घर क्र.114, उसर्ली बुद्रुक, पो.वाजे येथील पूर्वेस-नारायण डोंगरकर यांचे घर, पश्चिमेस-दशरथ निंबाळकर यांचे घर, दक्षिणेस-रामचंद्र निंबाळकर यांचे घर व उत्तरेस-शेती हा परिसर.
उलवे येथील इंटिग्रेटेड आय.आर. एस. टॉवर, प्लॉट नं.6,7, सेक्टर-21, , ए विंग, दुसरा मजला हा इमारतीचा भाग.
बोनशेत येथील ओमकारेश्वर सोसायटी, ए-2,  पूर्वेस-वॉल कंपाऊंड, पश्चिमेस-ए-3 भूपती, दक्षिणेस-ए-1 अमित, व उत्तरेस-वॉल कंपाऊंड आणि शेती हा परिसर.
मु.ओवळे, पो.पारगाव येथील पूर्वेस-दर्शन सहदेव मुंगाजी यांचे घर, पश्चिमेस-गहनीनाथ राम पाटील यांचे घर, दक्षिणेस-जनार्दन कृष्णा पाटील यांचे घर व उत्तरेस-विनोद राम मुंगाजी यांचे घर हा परिसर.
गव्हाण येथील पूर्वेस- कातेश्वरी महिला पतपेढी, पश्चिमेस-स्मिता म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस-गोपीनाथ कोळी यांचे घर व उत्तरेस-संदिप कोळी यांचे घर हा परिसर.
मु.नांदगाव, पो.पळस्पे येथील पूर्वेस-सार्वजनिक रस्ता नांदगाव, पश्चिमेस-अनिल भगत यांचे घर, दक्षिणेस-भगत आळी अंतर्गत रस्ता व उत्तरेस-गुरुनाथ अनंत घोरपडे यांचे घर हा परिसर.
मु.नांदगाव, पो.पळस्पे येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-निलेश बुधाजी भगत यांचे घर, दक्षिणेस-नारायण भगत यांचे घर व उत्तरेस-नितीन अर्जून खुटले यांचे घर हा परिसर.
कोळवाडी येथील पूर्वेस-सावळाराम भोईर यांचे घर, पश्चिमेस-भाऊ शाम भोईर यांचे घर, दक्षिणेस-भरत भोईर यांचे घर व उत्तरेस-वामन भोईर यांचे घर हा परिसर.
 मु.कोपर, पो.गव्हाण येथील करोना बाधित रुग्ण राहत असलेले किरण हरिश्चंद्र ठाकूर यांचे घर हा परिसर.
मु.दापोली, पो.पारगाव येथील पूर्वेस-पद्याकर भिवा पाटील यांचे घर, पश्चिमेस-लता मिरकुटे यांचे घर, दक्षिणेस-भिम शिवराम डाऊर यांचे घर व उत्तरेस- गणेश गजानन पाटील यांचे घर हा परिसर.
देवद येथील त्रिमूर्ती घरकुल सोसायटी, सी विंग, देवद गाव,पारगाव हा परिसर.
मु.बेलवली, पो.चिखले येथील पूर्वेस-एकनाथ पाटील यांचे घर, पश्चिमेस-अंगणवाडी व प्राथमिक शाळा, दक्षिणेस- वसंत रामा हातमोडे यांचे घर व उत्तरेस-कृष्णा वंदू पाटील यांचे घर हा परिसर.
मु.दापोली, पो.पारगाव येथील पूर्वेस-हिरामण हरी जितेकर यांचे घर, पश्चिमेस-राम मुंगाजी यांचे घर, दक्षिणेस-रेल्वे लाईन व उत्तरेस- रोशन विजय जितेकर यांचे घर हा परिसर.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक