पेण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित


   

अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :- जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे पाटणोली येथील पांडूरंग नारायण कोळी यांचे घर ते धनाजी चिंतामण कोळी ते विकी बाबूराव कोळी यांच्या घरापर्यंतचे क्षेत्र
मौजे तांबडशेत येथील श्रीमती मनिषा समाधान पाटील यांचे घर (खोली क्र.1) ते ज्ञानेश्वर नामदेव पाटील यांचे घर (खोली क्र.4) पर्यंतचे एकूण चाळीतील रुम क्र.01 ते 05 हे क्षेत्र
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण  श्रीमती प्रतिमा पुदलवाड-शेंगूलवार यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण  श्रीमती प्रतिमा पुदलवाड-शेंगूलवार यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक