पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



  
 अलिबाग, जि.रायगड, दि.09 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
कोळवाडी येथील पूर्वेस-आकाश भोईर यांचे घर, पश्चिमेस-रिकामी पडीक जागा, दक्षिणेस-धोंडू भोईर चाळ व उत्तरेस-संतोष भोईर यांचे घर हा परिसर.
कोप्रोली येथील रॉयल मिडोज को.ऑप.हौ.सो.,बी-1 विंग, पूर्वेस-बी-2 विंग, पश्चिमेस-जी-1 विंग, दक्षिणेस-ए-2 व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
पालेबुद्रुक येथील कृष्णा पार्क, इ-2 विंग, पूर्वेस-गार्डन, पश्चिमेस-रिकामी जागा, दक्षिणेस-बिल्डिंगनं.3 कृष्णा पार्क व उत्तरेस-ए विंग हा परिसर.
कानपोली येथील पूर्वेस-बाळाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-सोपान पोरजी यांचे घर, दक्षिणेस-संजय पवार यांचे घर व उत्तरेस-संजय भोईर यांचे घर हा परिसर.
मु.बंबावीपाडा, पो.वहाळ येथील पूर्वेस-प्रविण नरेश मुंडकर यांचे घर, पश्चिमेस-चेतन बाळकृष्ण पाटील यांचे घर, दक्षिणेस-समीर जनार्दन मुंडकर यांचे घर व उत्तरेस-हरिश्चंद्र जनार्दन पाटील यांचे घर हा परिसर.
वाजे येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-बारकी पाटील यांचे घर, दक्षिणेस-काळूराम पाटील यांचे घर व उत्तरेस-शेती हा परिसर.
डेरवली येथील बालाजी रेसिडेंन्सी को.ऑ.हौ.सो.सी-विंग डेरवली हा परिसर.
मु.बारवई, पो.पोयंजे येथील पूर्वेस-रामचंद्र भाऊ दळवी यांचे घर, पश्चिमेस-मारुती पांडूरंग हागे यांचे घर, दक्षिणेस-हरिश्चंद्र जनार्दन दळवी  यांचे घर व उत्तरेस-इतिका मजर खान यांचे घर हा परिसर.
देवद येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले रुम नं.306 हे घर, प्रथमेस रेसिडेंन्सी को.ऑ.हौ.सोसा., ए विंग, देवद हा परिसर.
मु.भिंगार घर क्र.89, मारुती मंदिरासमोर, पो.आजिवली येथील पूर्वेस-मधूकर बळीराम मनोरे यांचे घर, पश्चिमेस-परशुराम जानू वरे यांचे घर, दक्षिणेस-मारुती मंदिर व उत्तरेस-विठ्ठल रखुमाई मंदिराकडे जाणारा रस्ता हा परिसर.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक