पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



  
 अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे कोपर येथील पूर्वेस-नवजीवन हेल्थकेअर, पश्चिमेस-उदय जानू घरत यांचे घर,दक्षिणेस-रघुनाथ सोमा घरत यांचे घर व उत्तरेस-गजानन वामन घरत यांचे घर हा परिसर.
मु.पाटनोली,पो.कुंडेवहाळ येथील पूर्वेस-शरद काना पाटील यांचे घर, पश्चिमेस-पडिक शेती, दक्षिणेस-प्रभाकर कान्हा पाटील यांचे घर व उत्तरेस-कानुबाई कमलाकर पाटील यांचे घर हा परिसर.
मु.दिघाटी, पो.केळवणे येथील पूर्वेस-रुबाबन बंधू पाटील यांचे घर, पश्चिमेस-दिपक नथुराम पाटील यांचे घर, दक्षिणेस-पडिक घर व उत्तरेस-गणपती मंदिर हा परिसर.
उलवे येथील मु.इलिजन्ट ऑलिमपीया बिल्डिंग, को.ऑ.हौ.सो.,प्लॉट नं.23, सेक्टर-21, सहावा  मजला हा इमारतीचा भाग.
मु.देवळोली, पो.रसायनी येथील पूर्वेस-हरिश्चंद्र गणपत पाटील यांचे घर, पश्चिमेस-शेती, दक्षिणेस राजेश शंकर पाटील यांचे घर व उत्तरेस-रमेश शंकर पाटील यांचे घर हा परिसर.
मु.शिवाजीनगर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-कृष्णा पवार यांचे घर, पश्चिमेस-ड्रीम सेल्टर, प्लॉट नं.15 बी, सेक्टर-10, दक्षिणेस हिरामण ठाकूर यांचे घर व उत्तरेस भास्कर पाटील यांचे घर हा परिसर.
मु.पालीखुर्द, पो.चिखले येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-वामन शेळके यांचे घर, दक्षिणेस-रामदास शेळके यांचे घर व उत्तरेस मोकळी जागा हा परिसर.
मौजे खेरणे येथील पूर्वेस-गावाचा रस्ता, पश्चिमेस-गणेश गोंधळी यांचे घर,दक्षिणेस-प्रल्हाद म्हात्रे यांचे घर व उत्तेरस-भास्कर पाटील यांचे घर हा परिसर.
मु.कुडावे-वाडा, विष्णू मंदिराजवळ, पो.पळस्पे येथील पूर्वेस-नदी, पश्चिमेस कृष्णा लडकू ठोंबरे यांचे घर, दक्षिणेस-नदी व उत्तरेस-शेती हा परिसर.
मौजे बारपाडा येथील पूर्वेस-मरियन दाखवे यांचे घर, पश्चिमेस-नजीर अब्दुल कादीर दाखवे यांचे घर, दक्षिणेस-आब्बस शेख अब्दुल्ला दाखवे यांचे घर व उत्तरेस-आराफस महमद सदीद दाखवे यांचे घर हा परिसर.
मु.पो.खेरणे येथील पूर्वेस-अशोक माळी यांचे घर, पश्चिमेस-सुरेखा पाटील यांचे घर, दक्षिणेस-गुरुनाथ पाटील यांचे घर व उत्तरेस-नरेश पाटील यांचे घर हा परिसर.
मु.पो.वहाळ येथील पूर्वेस-पारु बाबू कुंज यांचे घर, पश्चिमेस-नरेश गंगाराम घरत यांचे घर, दक्षिणेस-चेतन ठोकाळे यांचे घर व उत्तरेस-उपकेंद्र वहाळ हा परिसर.
मु.पो.साई येथील पूर्वेस-राजेश जनार्दन मोकल यांचे घर, पश्चिमेस-ज्ञानेश्वर हासूराम मोकल यांचे घर, दक्षिणेस-राधाबाई बाळकृष्ण मोकल यांचे घर व उत्तरेस-दिनकर नारायण मोकल यांचे घर हा परिसर.
मु.पो.साई येथील पूर्वेस-गोपीनाथ लक्ष्मण ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-बंद घर, दक्षिणेस-दशरथ रामचंद्र मोकल यांचे घर व उत्तरेस-कमला महादेव म्हात्रे यांचे घर हा परिसर.
मु.पो.साइे येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-यमुना नामदेव मोकल यांचे घर व उत्तरेस-एकनाथ दामाजी मोकल यांचे घर हा परिसर.
मु.पो.केळवणे येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-भगवान दशरथ पाटील यांचे घर, दक्षिणेस-पडीक विहिर व उत्तरेस-पडिक शेती हा परिसर.
मु.दिघाटी, पो.केळवणे येथील पूर्वेस-अनिल गजानन पाटील यांचे घर, पश्चिमेस-आत्माराम नामदेव पाटील यांचे घर, दक्षिणेस रोशन हिराजी ठाकूर यांचे घर व उत्तरेस सुमन मधूकर पाटील यांचे घर हा परिसर.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक