छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 ऑनलाईन अर्ज भरण्यास 14 एप्रिल तर एकवेळ समझोत्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत  ऑनलाईन अर्ज भरण्यास 14 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर  एकवेळ समझोता योजनेअंतर्गत  पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत यापूर्वीच्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा मुदत 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आली होती. ती आता शनिवार दि. 14 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शासनाच्या दिनांक 7 डिसेंबर च्या शासन निर्णयान्वये मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना  (One Time Settlement) या योजनेअंतर्गत  पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम भरण्याची अंतिम मुदतीत वाढ करुन ती शनिवार दि.30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.तरी शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा फायदा घेऊन ऑनलाईन अर्ज शनिवार दि.14 एप्रिल पर्यंत व एकवेळ समझोता योजनेचा फायदा घेऊन पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम शनिवार दि. 30 जून पर्यंत भरणा करावी व या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,रायगड अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक