अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 'प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती' ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत


अलिबाग दि.19,(जिमाका):- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी घोषित केलेल्या पंधरा कलमी योजना राज्यातील मुस्लिम,शिख, ख्रिश्चन बौद्ध,शीख,पारशी व जैन या अल्प संख्यांक समाजातील इयत्ता पहिली ते दहावी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
सन 2017-18 या वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने 31ऑगस्ट पर्यंत नवीन विद्यार्थ्यांचे व 31 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती नुतनीकरण अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.
 या योजनेसाठीच्या पात्रता व अटी याप्रमाणे आहेत- इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व शासकीय , निमशासकीय, खाजगी अनुदानीत. कायम विनाअनुदानीत मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्प संख्यांक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. इ.पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही.,पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.,एका कुटूंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.  अर्ज भरतांना कुटूंबाचे उत्पन्न, गुण व टक्केवारी इत्यादी माहिती अचूक भरावी. धर्म, उत्पन्न, गुणपत्रक, आधारकार्ड, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत.
 ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थींनींसाठी राखीव आहे. सन 2016-17 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या,  शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी  पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2017-18 करीता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरण अर्ज National Scholarship portal (NSP) www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित  शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक अनिवार्य आहे व तो क्रमांक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याशी संलग्न केलेला असणे आवश्यक आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद, यांनी आवाहन केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक