पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाची सतर्कतेसाठी सज्जता


अलिबाग दि.17 (जिमाका), प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडील आज प्राप्त  सूचनेनुसार पुढील 48 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (12 से.मी ते 24 से.मी) ही पूर्वसूचना दिली आहे. तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे.
 वरील सुचना लक्षात घेता अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना करण्याच्या व पुर परिस्थितीस समोरे जाण्यासाठी बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा ,नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322 या क्रमांकावर द्यावी,अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक