“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर

रायगड,दि.05(जिमाका):- “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून या अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम.पुनिता गुरव यांनी दिली आहे. रायगड जिल्हयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठया प्रमाणावर यशस्वी झाले असून जिल्हयातील 3 हजार 535 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणी सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम जिल्हयातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, व जिल्हा पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले आहे. आयुक्त, शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.03 मार्च 2024 च्या पत्रानुसार मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली ता. कर्जत ही शाळा राज्यात दुसरी आली असून या शाळेला 21 लाखाचे पारिताषिक देण्यात येणार आहे. इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधून मुंबई विभागीय स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर ता.पनवेल ही शाळा प्रथम क्रमावर निवडण्यात आली व या शाळेला रु.21 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच रोहा तालुक्यातील नगर परिषद ऊर्दू शाळा विभागीय स्तरावर तिसरी आली असून या शाळेस 7 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर शासकीय प्रवर्गात रा.जि.प., प्राथमिक शाळा पेझारी ता.अलिबाग ही शाळा पहिल्या क्रमांकाने पात्र झाली. तसेच रा.जि.प., प्राथमिक शाळा रानवली ता.श्रीवर्धन ही शाळा दुसऱ्या क्रमांकाने पात्र झाली. रा.जि.प., प्राथमिक शाळा नवघर ता. सुधागड रानवली ही शाळा तिसऱ्या क्रमांकाने पात्र झाली. इतर व्यवस्थापन प्रकारामध्ये प्रथम क्रमांकावर संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगांव ता. सुधागड तसेच छत्रपती विद्यालय वरंध ता.महाड ही व्दीतीय क्रमांक तसेच दांडगुरी हायस्कूल दांडगुरी ता.श्रीवर्धन या शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 2 शाळांना 22 लक्ष व्दितीय क्रमांकासाठी 2 शाळांना 10 लक्ष रु.तृतीय क्रमांकासाठी 2 शाळांना 6 लक्ष रुपयाची पारितोषिके दिली जाणार आहेत. तालुकास्तरावर सर्व तालुके मिळून प्रथम क्रमांकासाठी 45 लक्ष व्दितीय क्रमांकासाठी 30 लक्ष व तृतीय क्रमांकासाठी 15 लक्ष अशी एकूण 1 कोटी 28 लक्ष रुपयाची बक्षिसे शाळांना दिली जाणार आहेत, राज्य व विभागस्तर व जिल्हा व तालुकास्तरावर पारितोषिके मिळविणाऱ्या सर्व शाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष मूल्यांकन समिती, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सत्यजित बडे, यांनी अभिनंदन केले. या शाळांचे जिल्हास्तरीय मुल्यांकन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम.पुनिता गुरव, ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट पनवेल सागर तुपे व उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे व सदस्य सचिव संतोष शेडगे त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी म्हणून श्रीम.कल्पना काकडे यांच्या एकाच पथकाने केले. 00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक