डिजीटल सेवापुस्तक अनुकरणीय उपक्रम- जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी


            अलिबाग, जि. रायगड, दि.3 (जिमाका)-  खालापुर तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाची माहिती डिजीटल  स्वरुपात तयार करण्याचा हा उपक्रम अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
महाराजस्व अभियान-2017 अंतर्गत कर्जत तालुक्याचे प्रातांधिकारी दत्ता भडकवाड यांनी खालापूर तालुका तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवापुस्तकाची माहिती डिजीटल स्वरुपात तयार केली असून या सीडीचे वितरण जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसिदार  उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना  संगणकीय सादरीकरणाद्वारे या उपक्रमाबाबतची माहिती उपस्थितांना दाखविण्यात आली.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड