31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह वाहन धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी



अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण  रायगड व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहास दि.11 जानेवारी पासून प्रारंभ झाला असून वाहन चालविताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.  पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात आयोजित 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 कार्यक्रमात ते बोलत होते.
              यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण श्रीमती उर्मिला पवार,सहायय्क पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा रायगड शहाजी शिरोळे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, वाहन चालवितांना  होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाने वाहन चालविताना योग्य ती काळजी घेतली व नियमांचे पालन केले तर नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल.  आपला मुलगा वाहन व्यवस्थित चालवितो किंवा नाही, हेल्मेट वापरतो की नाही हे पहाणे आई-वडीलांचे कर्तव्य आहे.  आपल्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे.   ज्यांच्याकडे टू व्हिलर आहे त्या प्रत्येकाने घरातील माणासांना वाहन चालविताना हेल्मेट वापरण्यास सांगितले पाहिजे.    सुरक्षित रस्ता वाहतुकी संदर्भातील नियम, वाहन चालविताना योग्यप्रकारे सिटबेल्टचा वापर, दुचाकी वाहन धारकांसाठी हेल्मेटचा वापर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करण्याबाबत त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती साहित्याचे प्रकाशनही करण्यात आले.  यावेळी प्रिझम सामाजिक संस्था अलिबाग यांनी  रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.   तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनीही रस्ता सुरक्षा सप्ताह संदर्भात यथोचित माहिती उपस्थितांना सांगितली.
रायगड जिल्हा पोलीसदल जिल्हा वाहतूक शाखा रायगड अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या चित्रकला स्पर्धेत विजेत्या स्पर्धेकांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.



रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा गटानुसार निकाल
इयत्ता 5 वी ते 7 वी गट
प्रथम-प्रतिक अशोक पालने-अभिनव ज्ञानमंदिर प्रशाला कर्जत. व्दितीय सुरज लक्ष्मण वायदंडे-को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबाग. तृत्तीय-भाग्यता अनिल देवरुखकर-जनता विद्यालय मोहोपाडा. उत्तेजनार्थ-1 मदिश अब्दुल जलिल पांगरकर-अंजुमन इस्लाम ज्युनिअर हायस्कूल, मुरुड. उत्तेजनार्थ-2 सारा निलेश थळे-आर.सी.एफ.सेकंडरी व हायर सेकेंडरी स्कूल, कुरुळ.
इयत्ता 8 वी ते 10 वी गट
प्रथम-मनोज नारायण चव्हाण-अभिनव ज्ञानमंदिर प्रशाळा कर्जत. व्दितीय- स्वराली नितेश राऊत-डेव्हीड इंग्लिश मिडीयम स्कूल चोंढी. तृत्तीय-रितेन संजय मोरे-जनता हायस्कूल गडब. उत्तेजनार्थ-1 श्रुती संदिप कदम-को.ए.सो. पार्वतीबाई महादेव भरवळ कन्या शाळा महाड. उत्तेजनार्थ-2 निकिता शांताराम भदे- सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक, श्रेया सुशिल कडीकर-डी.के.ई.टी. अलिबाग.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण श्रीमती उर्मिला पवार यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस विभाग व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पेण येथील अधिकारी,कर्मचारी आणि  विविध कॉलेजचे विद्यार्थी,विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक