रक्तदान दिनानिमित्त प्रभातफेरीतून जनजागृती




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1- स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त आज  जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत  प्रभात फेरीचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते या प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी  अति. जिल्हा शल्य चिकित्सक  अधिपरिचारिका जयश्री मोरे, अधि सेविका तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने, गणेश सुतार, रक्त पेढीचे डॉ. दीपक गोसावी, डॉ. निशा तेली, सुनिल बंदीछोडे, हेमकांत सोनार, विरेंद्र स्वामी, मनिषा नवाळे, चेतना वर्तक, पुनम पाटील, जयश्री दोरे. महेश धाडगे,  उमेश पाटील,  फरीद आकवारे  आदी उपस्थित होते.
 यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. गवळी म्हणाले की,  रक्तदान चळवळ समाजात रुजविणे  अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  डॉ. फुटाणे यांनी मानवी रक्ताला पर्याय नसल्याने  रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान हेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
 शहरातील प्रमुख मार्गावरुन सकाळी ही फेरी निघून त्यात रक्तदानाचे महत्व  अधोरेखित करणारे संदेश व घोषणा प्रसारित करण्यात आल्या. या रॅलीत श्रीसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक