‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन



अलिबाग जि.रायगड,दि.6(जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचा माहे ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे आज पेण येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
ना. चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना पेण येथे गोपाळकृष्ण सभागृहात आयोजित कार्यक्रमात हे अनावरण करण्यात आले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आ. प्रविण दरेकर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
लोकराज्यच्या माहे ऑक्टोबरच्या विशेषांकात  महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त परिवर्तन ह्या सूत्राने महाराष्ट्रात होत असलेल्या  परिवर्तनाची स्पंदने टिपण्यात आलेली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री ना. गिरीश बापट हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींविषयी ‘ युगपुरुषाचा आदर्श’ हा लेख लिहून महात्मा गांधीच्या मार्गदर्शक वाटचालींचा व विचारांची वाटचाल मांडून आपली आदरांजली व्यक्त केली आहे. या विशेषांकात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामिण भागात होत असलेल्या परिवर्तनाच्या यशकथा मांडण्यात आल्या आहेत. त्यात रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानावर आधारीत यशकथाही प्रसिद्ध झाली आहे.
00000
          

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड