मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समिती बैठक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका)- मुद्रा बॅंक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरुणांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार,  तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  आज येथे दिले.
जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार व उद्योजकता विकास एस.जी.पवार, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद निंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, अशासकीय सदस्य कल्पना राऊत, मिलिंद पाटील, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी मुद्रा बॅंक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बॅंका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याबाबत मत मांडण्यात आले.  बॅंकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातांना लाभार्थ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर या योजनेचा उद्देश रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती असा आहे. तेव्हा ही योजना  रोजगार स्वयंरोजगारास अनुकूल असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात यावी, त्यासाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक