कर्जत येथे 9,10 व 11 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे कर्जत येथे  दि. 9 , 10 व 11 रोजी  मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  हे शिबिर रॉयल गार्डन मंगल कार्यालय, कर्जत येथे सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत  होणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात मुंबई, नवी मुंबई, एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे,  डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ,  येरळा मेडीकल ट्रस्त खारघर, लक्ष्मी आय चॅरीटेबल  ट्रस्ट पनवेल, एम्पथी फाऊंडेशन चेंबुर,  तसेच नेरुळ, पनवेल परिसरातील तज्ज्ञ डॉक्टर्स,  उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी करतील. रुग्णांना मोफत तपासणी सोबत औषधोपचार,  प्रयोगशाळा चाचण्या,इ.सी.जी आदी  मोफत उपलब्ध  केल्या जातील. यावेळी भिषक तज्ज्ञ, जनरल सर्जन, हृदय रोग तज्ज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ,  बालरोग तज्ज्ञ,  विकलांग तपासणी, दंतरोग तज्ज्ञ,  आयुर्वेद तज्ज्ञ, कान, नाक ,घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ आदी तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी य मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. गावपातळीवर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याकडे नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या रुग्णांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येईल. तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरिग्य. शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती नरेश तातुराम पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी केले आहे. 
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड