रायगड जिल्ह्यासाठी नवीन मतदान यंत्रे दाखल



अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका)- भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्ह्यासाठी  नवीन मतदान यंत्रे ( कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट) दाखल झाळे आहेत. लवकरच व्हीव्हीपॅट (VVPATs) मशिन्सही दाखल होणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.
 भारत निवडणूक आयोगामार्फत रायगड जिल्ह्यात 3326 कंट्रोल युनिट (C.U.), 5721 बॅलेट युनिट (B.U.) प्राप्त झाले आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारपासून (दि.4) सुरु झाली. यावेळी राजकीय पक्षांचे  प्रतिनिधीही उपस्थित होते.  या प्रथमस्तरीय तपासणीबाबत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही अवगत करण्यात आल्याचे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक