ग्राहक संस्थांना अनुदान; नोंदणीकृत संस्थांकडून प्रस्ताव मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- महाराष्ट्र ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम 1992 मधील परिच्छेद 7 नुसार राज्य शासनाकडून सहाय्यक अनुदान वितरीत करण्यासाठी महाराष्ट्रात ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणाऱ्या, परंतु ग्राहक चळवळ,ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
तसेच ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणाऱ्या ग्राहक संस्थांव्यतिरिक्त् इतर क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु ग्राहक चळवळीचेही कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना शासनाकडून अनुदान वितरीत करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून सोबत अर्जाचा नमुनाही महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध् करुन देण्यात आला आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी विहीत नमुन्यातील त्यांचा प्रस्ताव 30 दिवसाच्या आत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेपूर्वी किंवा तत्पूर्वी प्राप्त् होतील या बेताने सादर करावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त् झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही याची नोंद घ्यावी. यामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार अन्न्, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. असे आवाहन भा.बा. पाटील, शासनाचे उप सचिव यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक