लोकराज्य वाचक अभियान ‘लोकराज्य’ च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवा- डॉ. गणेश मुळे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-शासन जनतेसाठी नेमक काय करतं याची महत्त्वाची व विश्वासार्ह माहिती ‘लोकराज्य’ मासिकात दरमहा प्रसिद्ध होत असते. असे हे लोकराज्य मासिक वाचून आपण शासकीय योजनांची माहिती ही समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना  योजनांच्या लाभापर्यंत पोहोचवू शकता, असे आवाहन कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी शनिवारी (दि.29) येथे केले.
येथील स्पर्धा विश्व ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांशी लोकराज्य वाचक अभियानाअंतर्गत डॉ. मुळे हे संवाद साधत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, ॲकेडमीच्या संचालिका तपस्वी गोंधळी, सुचेता साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲकेडमीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. मुळे म्हणाले की,आपले शासन हे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवित असते. अनेक निर्णय घेत असते. याबाबतची सर्व माहिती लोकराज्य मधून दरमहा प्रसिद्ध होत असते. लोकराज्य वाचनाने आपल्याला या सर्व योजनांची माहिती होत असते. समाजातील विविध घटकांना या योजनांची माहिती देऊन आपण त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवू शकतो. स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवांमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी शासनामार्फत प्रकाशित होणारे लोकराज्य हे मासिक आवर्जून वाचले पाहिजे. यावेळी डॉ. मुळे यांनी युवकांना मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन तपस्वी गोंधळी यांनी केले. तर सुचिता साळवी यांनी आभार मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक