केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य योजनेच्या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

 

 

रायगड(जिमाका)दि.25:-महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह बालगृह कर्जत सनशाइन अपार्टमेंट, पहिला मजला, डी विंग, आदिवासी वसतीगृहाच्या शेजारी, जनता हायस्कूल मागे, पाटील आळी, शिवाजी नगर, दहिवली ता. कर्जत या ठिकाणी केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य या योजनेच्या मार्गदर्शक सुचना 2022 अन्वये 11 पदे 10 महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर भरावयाची आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

भरावयाच्या पदांची माहिती पुढीलप्रमाणे :-भांडार रक्षक तथा लेखापाल, पद संख्या-1,मासिक मानधन एका पदास- रु.18 हजार 536, शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी (बी. कॉम असल्यास प्राधान्य),Ms-cit किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 30, व इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे,वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास.

निमवैद्यकीय कर्मचारी,पद संख्या-1 मासिक मानधन एका पदास-रु.11 हजार 916 शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त संस्थेची ए.एन.एम/जी.एन.एम., वय मर्यादा 18 ते 38 वर्ष,  अनुभव- वैद्यकीय क्षेत्रात कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

शिक्षक,पद संख्या-1,  मासिक मानधन एका पदास-रु.10 हजार,  शैक्षणिक अर्हता- अनुभव- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी व बी.एड/ 12 वी व  डि.एड, वय मर्यादा 18 ते 38 वर्ष अथवा सेवा निवृत्त शिक्षक यांची वयोमर्यादा 65 वर्षा पर्यंत असेल. अनुभव-शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कला व शिल्प संगीत शिक्षक,पद संख्या-1,  मासिक मानधन एका पदास-रु.10 हजार,  शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी,इलेमेन्ट्री I/ इंटरमिजेंट II/ATD संगीत शास्त्रात पदवी यापैकी एक परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे, यांचे अर्ज प्राप्त न झाल्यास डि.एड अथवा बी.एड. पदवी यांना प्राधान्य देण्यात येईल, वय मर्यादा 18 ते 38 वर्ष,अनुभव-शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. तसेच अर्जदार सेवा निवृत्त चित्रकलेचे, संगीत शिक्षक असल्यास वयाची अट रद्द करण्यात येईल व प्राधान्य देण्यात येईल.

शारिरीक शिक्षक (पि.टी.) निर्देशक -नि-योग प्रशिक्षक, पद संख्या-1, मासिक मानधन एका पदास-रु.10 हजार,  शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी,( बी.पी.एड) असल्यास प्राधान्य), वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, सेवा निवृत्त PT शिक्षक यांची वयोमर्यादा 65 वर्षा पर्यंत असेल, अनुभव-शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य, तसेच अर्जदार सेवा निवृत्त क्रिडा शिक्षक असल्यास वयाची अट रद्द करण्यात येईल व प्राधान्य देण्यात येईल.

गृहपिता, पद संख्या-2, मासिक मानधन एका पदास-रु.14 हजार 564,  शैक्षणिक अर्हता- एस.एस.सी.,वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शारीरीकदृष्टया सक्षम असणे आवश्यक, शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

स्वयंपाकी, पद संख्या-1, मासिक मानधन एका पदास-रु.9 हजार 930,  शैक्षणिक अर्हता- सातवी, वय मर्यादा 18 ते 55 वर्ष, अनुभव-शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत स्वयंपाकाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

मदतनीस, पद संख्या-1, मासिक मानधन एका पदास-रु.7 हजार 944,  शैक्षणिक अर्हता- एस.एस.सी., वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शारीरीकदृष्टया सक्षम असणे आवश्यक, शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

डाटा एन्ट्री ऑपरेटर CWC & JJB, पद संख्या-2, मासिक मानधन एका पदास-रु.11 हजार 916,  शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी,एम.एस.सि.आयटी किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 30 व इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक, वय मर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव-शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत डाटा एन्ट्री कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

             इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि.24 सप्टेंबर  ते दि.15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या  वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड, दिप महल, दुसरा मजला, श्रीस्वामी समर्थ नगर, पिंपळभाट-चेढरे, अलिबाग.ता अलिबाग, जि.रायगड या कार्यालयात विनामुल्य मिळतील.  तसेच दि.15 ऑक्टोबर 2024, वेळ 6.00 वाजेनंतर कोणतेही प्रकारचे अर्ज स्विकारले जाणार नाही.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड