पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत उपाययोजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपासंबंधी आढावा बैठक



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-  राज्यमंत्री उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड जिल्हा कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत उपाययोजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपासंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे शनिवार दि.27 जून, 2020 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., पनवेल महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,  सहाय्यक आयुक्त मस्त्य व्यवसाय, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, अलिबाग, महाड, पनवेल, कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण यांना उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचित केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक