पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
            शनिवार दि.27 मे, 2020 सकाळी 9.45 वा. सुनिती शासकीय निवासस्थान येथून मोटारीने भाऊचा धक्काकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. भाऊचा धक्का येथे आगमन व खा.सुप्रियाताई सुळे व खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्यासमवेत रो-रो-जेट्टीने मांडवा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मांडवा येथे आगमन व खा.सुप्रियाताई सुळे, खा.सुनिल तटकरे, खा.अमोल कोल्हे यांच्या समवेत मोटारीने नांदगाव, ता.मुरुड कडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. नांदगाव, ता.मुरुड येथे आगमन व श्री छत्रपती शिवाजी नुतन विद्यालय येथे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळेची पाहणी व मदत वाटप कार्यक्रम. सकाळी 12.30 वा. नांदगाव येथून मुरुडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. अंजूमन-ए-इस्लाम हायस्कूल, मुरुड येथे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळेची पाहणी व मदत वाटप कार्यक्रम. दुपारी 2.00 मुरुड येथून प्रकृती रिसॉर्ट कडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. प्रकृती रिसॉर्ट  येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. प्रकृती रिसॉर्ट येथून खा.सुप्रियाताई सुळे, खा.अमोल कोल्हे यांच्या समवेत मांडवा जेट्टीकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. मांडवा येथून जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग कडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आगमन व शासकीय बैठकीस उपस्थिती. सोयीनुसार अलिबाग येथून सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक