जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन




      अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):-  कोविड 19 मुळे जिल्ह्यातून कुशल,अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे खाजगी आस्थापनांमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि. 29 व  30 जून 2020  या दोन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
त्यासा़ठी खाजगी आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेल्या कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टल वर दि. 27 जून 2020 पर्यंत नोटीफाइड करावीत. ज्या आस्थापनांनी यापूर्वी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी  https://rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करावी व आपल्याकडील रिक्त पदे या विभागाच्या वेबपोर्टलवर दि. 27 जून पर्यंत नोटीफाइड करावीत. नवीन नोंदणी करताना वेबपोर्टलवरील  Employment-Employer (List a Job)-Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याबाबतचे प्रमाणपत्र (Incorporation Certificate) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. 
वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करणे व रिक्त पदे अधिसूचित करणे, या संदर्भात खाजगी आस्थापनांना काही समस्या उद्भवल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र.9820452264 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग श्री. शा. गि. पवार यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड