स्थलांतरीत मजूरांनी त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी --जिल्हाधिकारी निधी चौधरी




अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):-  जिल्हयातील स्थलांतरीत मजूर त्यांच्या  राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी  https://migrant.mahabocw.in/migrant/form  या संकेतस्थळावर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निधी  चौधरी यांनी केले आहे. 
            स्थलांतरीत मजूरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.6/2020 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजूरांच्या नोंदणी करिता  https://migrant.mahabocw.in/migrant/form  हे संकेतस्थळ तयार केले आहे.
तरी रायगड जिल्हयातील स्थलांतरीत मजूर जे त्यांच्या  राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी या  संकेतस्थळावर नोंदणी करावी.
जिल्हयात खालील कार्यालयांमध्ये स्थलांतरीत मजूरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk) तयार करण्यात आले असून  या  मदत कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत- 
तहसील कार्यालय, पनवेल: 022 - 27452399, कामगार उपायुक्त कार्यालय पनवेल : 022- 27452835,
पोलीस उपायुक्त परिमंडल (2) कार्यालय ,पनवेल  : 022 - 27490476
जिल्हयातील जे स्थलांतरीत मजूर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यास इच्छुक आहेत, त्यांनी वर नमूद केलेल्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास कामगार उपायुक्त श्री. पवार, भ्र.क्र. : 7720859535 , वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले  आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक