जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याची सूवर्णसंधी




अलिबाग,जि.रायगड, दि.23 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सर्व कुशल, अकुशल बेरोजगार उमेदवारांसाठी आणि करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यात इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातील स्थलांतरित झालेल्या कुशल,अकुशल बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि. 29 व 30 जून 2020 रोजी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आपली आधार लिंक नाव नोंदणी करावी.  तसेच यापूर्वी या वेब पोर्टलवर नाव नोंदणी केली असेल त्यांनी आपली नाव नोंदणी आधार लिंक अद्ययावत करावी, जेणेकरून जिल्ह्यातील आस्थापनांकडून प्राप्त झालेल्या नोकरीच्या संधींसाठी आपल्याला ऑनलाइन मुलाखतीद्वारे नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते,
 जिल्ह्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी आपला बायोडाटा, शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, अनुभव www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आधार लिंकसह अद्ययावत करावे. ज्यामुळे त्यांना जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापनांवरील रिक्त असलेल्या जागांवर नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते.
तसेच स्वत:बद्दलची माहिती संबंधित वेब पोर्टलवर अद्ययावत करताना काही अडचण उद्भल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र.02141-222029 वर संपर्क साधावा आणि या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शा.गि.पवार यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक