रायगड येथे 25 सप्टेंबर ला डाक अदालत


 

रायगड जिमाका दि.11- डाक विभागाच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक तिमाहीमध्ये डाक अदालतीचे आयोजन केले जाते. दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

 इछूक ग्राहकानी रायगड डाक विभागातील आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग  सुनील थळकर, यांच्याकडे दि.22 सप्टेंबर 2023 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी.

            दि. 29 सप्टेंबर रोजी दु. ठीक 3.00 वाजता पोस्ट मास्टर जनरल नवी मुंबई रिजन, पनवेल पोस्ट ऑफिस बिल्डिंग, पनवेल यांचे कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. इछूक ग्राहकांनी जिल्हापातळीवर निराकरण न झालेली आपली तक्रार 2 प्रतीत पोस्ट मास्टर जनरल नवी मुंबई रिजन, पनवेल पोस्ट ऑफिस बिल्डिंग, पनवेल 410206 यांचेकडे दि. 18 सप्टेंबर पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी.

            दि. 27 सप्टेंबर रोजी, दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ, मुंबई 400001 यांचे कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करणेत आली आहे. इछूक ग्राहकांनी रिजनपातळीवर निराकरण न झालेली आपली तक्रार 2 प्रतीत मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, एनेकस बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स मुंबई 400001  यांच्याकडे दि. 15 सप्टेंबर2023 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी.

            संबधित विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार / समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झाले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तसेच तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.असणे आवश्यक आहे,असे अधिक्षक डाकघर रायगड विभाग  सुनील वसंत थळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक