मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश सुरु

 

रायगड(जिमाका) 13 :- सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण यांच्या अंतर्गत मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हुशार ,होतकरु, मागासवर्गीय,अर्थिकदृष्ट्या मागास, गरीब, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असून वसतीगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत 20सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत आहे. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहात खालील पत्त्यावर विनामूल्य् उपलब्ध आहेत.

1.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अलिबाग, गणेशमंदिर शेजारी,विजय नगर,वरसोली-अलिबाग.2.मागासवर्गीय व अर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह अलिबाग,दिव्या अपार्टमेंट,आर.सी.एफ.गेट समोर वेश्वी-अलिबाग,3. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह महाड तालुका पोलीस स्टेशनजवळ, नवेनगर, महाड जि.रायगड,4. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह तळा,तालुका क्रीडासंकुलाजवळ, बोरघर-हवेली,ता.तळा.5. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, चंद्रकांत कॉम्प्लेक्स, चांभारखिंड,रिलायन्स् पेट्रोल पंपाशेजारी, महाड,6. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पनवेल सेक्टर10, प्लॉट नंबर 21 ग्रीनपार्क सोसायटी समोर,7 मागासवर्गीय व अर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह शासकीय वसतीगृह पाली, मधली आळी, राम मंदिर रोड,पाली-सुधागड

सातही शासकीय वसतीगृहांसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे आहेत. आरक्षण-अनु.जाती 80%,अनु.जमाती-3%,विमुक्त् जाती, भटक्या जमाती 05%,विशेष मागास प्रवर्ग 02%,अर्थिकदृष्टया मागास 5%,अनाथ 3%अपंग -2% असे आहे.

वसतीगृहाची वैशिष्ट्ये:- 1.मोफत भोजन व निवास व्यवस्था,2.शैक्षणिक  अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके,3.शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु. 4000/- शैक्षणिक साहित्य् खरेदी भत्ता.,4. दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरीता म्हणून तालुका पातळीवर दरमहा रु.500/- व जिल्हा पातळीवर रु.600/- निर्वाहभत्ता, 5.शालेय/महा.शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेश भत्ता,6.प्रोजेक्ट रिपोर्ट/शै.सहल भत्ता,ॲप्रन भत्ता, स्नेहसंमेलन.

आवश्यक कागदपत्रे:- 1.प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न् अनु.जाती व अनु.जमाती विद्यार्थ्यांकरिता रु.2,50,000/-चे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.1,00,000/-चे आत असावे., 2.अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2022-23 मधील उत्पन्नाचा दाखला.,3.जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक.,4.बँक खात्याची झेरॉक्स, 5.आधारकार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड अलिबाग यांच्याशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा असे कळविले आहे.

 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक