भारतीय पोस्ट विभागाने ढाई आखर वार्षिक पत्र लेखन स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवल्या

 

 

अलिबाग (जिमाका),दि.13:- भारतीय पोस्ट विभागाने  ढाई आखर वार्षिक पत्र लेखन प्रतियोगिता २०२३-२४ अंतर्गत -नये भारत केलीये डिजिटल इंडिया(Digital India for New India) या विषयावर पत्र लेखन स्पर्धैची घोषणा केली असून  त्याची प्रवेशिकेची पत्रे चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी  31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मागवले आहेत.

स्पर्धेसाठी देश पातळी बक्षीस रक्कम पहिला क्रमांक 50 हजार दूसरा क्रमांक, 25 हजार रुपयेतिसरा क्रमांक 10 हजार रुपये तसेच राज्य पातळी पहिला क्रमांक बक्षीस रक्कम 25 हजार रुपयेदूसरा क्रमांक 10 हजार रुपये व तिसरा क्रमांक 5 हजार रुपये, स्पर्धेसाठी मराठी हिंदी/ इंग्लिश किंवा प्रादेशिक भाषेमध्ये अ) आंतरदेशीय पत्र श्रेणी (500 शब्द) (ब) लिफाफा श्रेणी   (1000 शब्द) नुसार 18 वर्षापर्यंत    18वर्षापुढील सर्व नागरीक या दोन स्वतंत्र वयोगटात भाग घेता येईल.

             या पत्रावर खालील वयाचे प्रमाणपत्र  लिहिणे बंधनकारक आहे. यामध्ये “ मी प्रमाणित करतो की मी  दिनांक 01/01/ 2023 या तारखेला 18 वर्षाखाली / वर आहे अशी नोंद करणे आवश्यक आहे. फक्त हस्तलिखित पत्र सदर स्पर्धेला पात्र असतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

            प्रवेशिकेची पत्रे मा. चीफ पोस्टमास्टर जनरल , महाराष्ट्र सर्कल, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पत्र पाठविण्याची शेवटची तारीख  31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पाठवावीत अथवा स्पर्धेची पत्रे नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावीत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक