राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धाः दर्जेदार क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करा- डॉ. नंदिनी बोंगाडे


अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)-  प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तशी क्रीडा क्षेत्रातही आहे. खेळाडूंनी स्पर्धेचे दडपण न घेता त्यांचा मुळ खेळ खेळून दर्जेदार कौशल्याचे प्रदर्शन सातत्यपुर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम घेऊन करावे, असे मार्गदर्शन हॅण्डबॉल खेळातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगांडे यांनी आज येथे केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतिने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन सौ. बोंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी रायगड जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संघटक सूर्यकांत ठाकूर, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेचे सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
 त्यापुढे म्हणाल्या की या स्पर्धेमधून राज्याचा संघ निवडण्यात येणार असून स्पर्धेत चमकदार कामगीरी करणाऱ्या खेळाडूंची पारदर्शकपणे निवड करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होणार आहेत त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंनी उत्तम कामगीरी करावी असे सांगुन त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे व कोल्हापूर अशा एकुण नऊ विभागातून 500 खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या प्रारंभी डॉ. नंदिनी बोंगाडे यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला व सुर्यकांत ठाकूर यांच्या हस्ते मैदानाचे पुजन करुन स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला तर रायगड जिल्ह्याची गतवर्षाची राष्ट्रीय पदकविजेती श्रावणी जाधव हिने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले. क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजचे निकालः-
14 वर्षाखालील मुले-
1.      नागपूर वि. वि. औरंगाबाद (35-21) (36-34)
14 वर्षाखालील मुली-
1.      पुणे वि. वि. कोल्हापूर (35-22), (35-22) 2. मुंबई वि. वि. औरंगाबाद ((35-27), (35-22) 3. लातुर वि. वि. अमरावती (33-35), (35-18), (35-26)
17 वर्षाखालील मुले-
1.      पुणे वि. वि. नागपूर (35-22), (35-30)
17 वर्षाखालील मुली-
1.      नागपूर वि. वि. लातुर (35-29), (35-31)
19 वर्षाखालील मुले-
1.      कोल्हापूर वि. वि. नागपूर (35-26), (35-26)
19 वर्षाखालील मुली-
नाशिक वि. वि. मुंबई (35-26), (35-32)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक