हवामानावर आधारित फळपिक विमा योजनाः काजूसाठी 30 नोव्हेंबर तर आंब्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत


अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- रायगड जिल्ह्यात आंबिया बहार सन 2018-19 मध्ये फळपिकासाठी विमा योजना  प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना या नावाने कार्यान्वीत आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचा अंतिम कालावधी मुदत काजू फळ पिकासाठी 30 नोव्हेंबर व आंबा या फळपिकासाठी 31 डिसेंबर 2018 अखेरपर्यत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  पांडुरंग भा. शेळके यांनी केले आहे.
1.    योजनेची उद्दीष्टे :-
1.कमी/जास्त पाऊस,पाऊसाचा खंड,वेगाचा वारा.
2.पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
2.      योजनेची वैशिष्टये :-
    1.कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
   2.शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर         यापैकी जी कमी असेल ती रक्कम असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
3.      योजना कार्यान्वयीन यंत्रणा :-
ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.
4.    योजनेत सहभागी शेतकरी :-
सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
5.     अधिसुचित करावयाची पिके :-
आंबा व काजू.
6.      जोखमीच्या बाबी :- या योजनेअंतर्गत पुढील करणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधी पर्यंत विमा संरक्षण दिले जाईल.  
अ.क्र
फळपिके
सामाविष्ठ  धोके
विमा संरक्षण कालावधी
1
काजू
1)     अवेळी पाऊस
1 डिसेंबर 2018  ते 28 फेब्रूवारी 2019
2)     कमी तापमान
3)     गारपीट
   1 जानेवारी 2019 ते  30 एप्रिल 2019
2.

आंबा
1)अवेळी पाऊस
1 जानेवारी 2019 ते 31 मे 2019
  2)कमी तापमान
   1 डिसेंबर 2018  ते 28 फेब्रूवारी 2019
3)अवेळी पाऊस
   16 एप्रिल 2019  ते 15 मे 2019
4)   जास्त तापमान
   15 मार्च 2019   ते 31 मे 2019
5)    गारपीट
   1 जानेवारी 2019 ते 30 एप्रिल 2019
7. विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान- या योजने अंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला      जाणार आहे तथापि शेतकऱ्यांनी फळपीक निहाय प्रति हे. विमा दर खलीलप्रमाणे आहेत.
अ.क्र
बहार
पिके
शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता
1.
आंबिया
आंबा, काजु
विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के
  फळपीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्यांनी भरावयाची विमा दर रक्कम
अ.क्र.
पिकाचे नाव
विमा संरक्षित रक्कम
शेतकरी हिस्सा
शेतकऱ्यांनी करीता विमा दर %
(विमा संरक्षित रक्कमेच्या)
कंपनीचे नाव
1.
काजू
83,600/-
4,180/-
5
ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.
2.
आंबा

1,21,000/-
6,050/-
5

शेतकऱ्यांनी फळपिकनिहाय गारपीटी या विमा संरक्षित धोक्याकरीता ऐच्छिक सहभागासाठी करावयाची विमा दर रक्कम

अ.क्र.
पिकाचे नाव
विमा संरक्षित रक्कम
शेतकरी हिस्सा
शेतकऱ्यांकरीता विमा दर %
(विमा संरक्षित रक्कमेच्या)
कंपनीचे नाव
1.
आंबा
27,867/-
1,393/-
5
ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.
2.
काजू
40,333/-
2,017/-
5

सदर योजना 2018-19 मध्ये जिल्ह्यातील तालुक्यांत समाविष्ट असणाऱ्या महसुल मंडळात निर्धारीत केलेल्या फळपीकनिहाय प्रमाणकानुसार ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.मार्फत लागू करण्यात येणार असुन शासन निर्णयात नमुद केलेल्या महसुल मंडळात केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या महावेद या प्रकल्पा अंतर्गत स्थापन केलेल्या संदर्भ हवामान केंद्रावर नोंदले गेलेल्या हवामानाची आकडेवारी व वरती नमुद केलेली फळपीक निहाय प्रमाणके यांची सांगड घालुन शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई परस्पर बँकेव्दारे अदा केली जाईल. नुकसान भरपाईचे कोणतेही दायीत्व शासनावर असणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  पांडुरंग भा. शेळके यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक