नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा 30 एप्रिल रोजी

अलिबाग, दि.22 (जिमाका):- माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील नवोदय विद्यालयाची इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा शनिवार, दि.30 एप्रिल 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण 15 केंद्रांवर होणार आहे. त्यासाठीचे विद्यार्थी प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याची माहिती प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील 15 परीक्षा केंद्रांवर 2 हजार 576 विद्यार्थी यावेळी इयत्ता सहावी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण 80 जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांकासह परीक्षा ओळखपत्रे www.navodaya.gov.in या विद्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत.

विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्रांचे पासवर्ड असणार आहेत. या प्रवेश पत्रांच्या दोन प्रती विद्यार्थ्यांनी काढाव्यात. एक प्रत परीक्षा केंद्रावर जमा करून घेतली जाणार आहे तर दुसरी प्रत विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. दोन्ही प्रतींवर विद्यार्थी पाचवी इयत्ता ज्या शाळेत सध्या शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असणे अनिवार्य आहे. सर्व परीक्षार्थींनी सकाळी ठीक 10.00 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. तसेच विद्यार्थ्यांना याबाबत काही माहिती हवी असेल तर त्यांनी श्री.संतोष चिंचकर यांच्याशी 9881351601 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक