महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (VSTF) वडगाव येथे जनजागृती कार्यशाळा संपन्न

अलिबाग,दि.20 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व ग्रामपंचायत वडगाव यांच्या माध्यमातून वडगाव येथे कोरोना मुक्त गाव… लोकजागर आरोग्याचा… हर घर दस्तक… या विषयांवरील जनजागृती कार्यशाळा  घेण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची ओळख व आरोग्याचे महत्व तसेच जागर आरोग्याचा उपक्रमाचे आयोजन याबद्दल सविस्तर माहिती देऊन गृह भेटीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी त्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

आरोग्य सेविका श्रीमती लांगे यांनी कीटकजन्य आजार व जलजन्य आजार याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्वांना स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता आवाहन केले. आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण यांनी इतर आजार व करोना लसीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच करोनाच्या संभाव्य 4थ्या लाटेविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी सरपंच शिवाजी गावडे, ग्रामसेविका श्रीमती लवटे, आरोग्यसेविका श्रीमती चव्हाण, श्रीमती लांगे, माणगाव तालुका समन्वयक दत्तात्रय गायकवाड व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक