वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध; इच्छुक पशुपालक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

अलिबाग,दि.20 (जिमाका):- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रति हेक्टर रुपये तीस हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेंर्तगत रायगड जिल्ह्याकरिता 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4.5 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा (पी के एम 1) बियाण्यांची किंमत रु.6 हजार 750 व अनुदान रु.23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड खताची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करणे अपेक्षित आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, रायगड-अलिबाग / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद/ पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक